तुका झालासे प्रसन्न

तुका झालासे प्रसन्न,
माग म्हणे वरदान.

काय मागू मी बापडा?
शब्द माझ्या कामी पाडा.

नको गरुडविमान,
नको संतत्वाचा मान.

मोक्ष, मुक्ती घेई कोण ?
ज्यासी हुंगे ना तो श्वान!

आकाशीचा स्वर्गवास
खाऊ कशा संगे त्यास ?

असे नको काहीबाही
घाल विठोबाचे पायी!

No comments:

Post a Comment