दोन्ही डोळ्यांतून

दोन्ही डोळ्यांतून
वाहे चंद्रभागा;
काळतोंड्या ढगा
ना ये लाज.

घडते निर्जला
रोज एकादशी;
वावर उपाशी
तहानले.

नको राहू उभा
आभाळी पसर;
कर शेतावर
अभिषेक!

No comments:

Post a Comment