चढली रे नशा

चढली रे नशा
बाटल्यांची सात
तुझ्या चिंतनात
झिंगलो मी.

माझ्यासाठी झाली
आता जगबुडी
आपली मी कुडी
विसरलो.

मुखाने अखंड
नामाची बरळ
भिजू ना दे तीळ
जिभेवर. 

एक पाय ऐल,
एक पाय पैल
जाऊ पाहे तोल
सांभाळी तू !

No comments:

Post a Comment