काय तुला कमी

काय तुला कमी
पडले ते सांग ?
काढले का अंग
माझ्यातून ?

नाही दिला माझ्या
बोलण्याशी कान
उतरली मान
तुझ्यापुढे.

धरिला का असा
माझ्यावरी दात
आखडला हात 
ऐनवेळी.

काय काळ्या, तुझ्या
पोटातही काळे ?
आरंभले चाळे
मूलसांडे.

No comments:

Post a Comment