आंधळ्याला दिली

आंधळ्याला दिली
तीक्ष्ण स्पर्शजाण
साकारे निर्गुण
त्याच्या हाती.

लंगड्याला लाभे
कल्पनेची गती
कवितेची मूर्ति
येई रूपा.

बहिर्‍याला दान
हृदय-संगीत
नाद अनाहत
रातंदिन.

अडाण्याला भेट
दिला भक्तिभाव
दातार तो देव
नाही कसा ?

No comments:

Post a Comment