दुसर्‍याचे दु:ख

दुसर्‍याचे दु:ख
वाटते शीतळ
काय त्याची कळ
अभोग्यासी ?

जननीच्या अंगा
पडे किती ताण ?
वांझोटीला जाण
काय त्याची ?

बोकडाचा गळा
तडफडे किती ?
सुरी ज्याच्या हाती
त्यासी काय ?

काय तुला कळे
माझी तळमळ ?
आहेस तू काळ
नैवेद्याचा !

No comments:

Post a Comment