येताजाता क्षण

येताजाता क्षण
हाणे मोठमोठे
घरावर गोटे
रात्रंदिन.

टोळांचे टोळके,
भैरव बेरके,
रुद्रही सारखे
भिवविती.

कधी हॉकीस्टिक, 
कधी साधी चेन
छिनतात चैन
चॉपरही.

धारीवर चाल
म्हणे तलवार
पोटी आरपार
दहशत.

जीवावर उभा
बंदुकीचा घोडा
नरमेध खडा
दारापाशी.

No comments:

Post a Comment