बसावया गोड

बसावया गोड
वाटते अंबारी
हत्तीच्या आहारी
ऊर फाटे.

मिरविता वाटे
बुडा गोड गोड
त्यासी येता फोड
दाखवेना.

कशाला केलीस
हत्तीची खरेदी
नसती उपाधी
दुर्बलासी.

लाव रोज आता 
नोटांचे तू तास
होशील खलास
हत्तीपायी.

No comments:

Post a Comment