कमलनयन

कमलनयन
दृष्टी चिखलाची खाण.

चाफेकळी नाक
मागे सुवासाची भीक.

मुखी गोड बोल
नाही अंतरात ओल.

बहुश्रूत भोळा
कानी कापसाचा बोळा.

देह हत्तीवाणी
मन कोते केसाहुनी.

No comments:

Post a Comment