चोखोबाच्या घरी

चोखोबाच्या घरी
जेऊनिया आलो
आणि शुद्घ झालो
अंतर्बाह्य.

रोहिदासे मज
पाजिले उदक
समतेची भूक
भागवली.

कबीराने असा 
पांघरला शेला
बाटवले मला
धर्मातीत !


No comments:

Post a Comment