तुको बादशहा : श्रीकृष्ण राऊत
मुडद्याचे केस
मुडद्याचे केस
उपटले जरी,
होईल का तरी
हलका तो ?
वरवर किती
लावला मलम
बुजेना जखम
अंतरीची.
जुन्या मधावाणी
वैद्य हवा जुना,
जाणेल जो नाना
रोगकळा.
त्याच्याविन वाया
सारे पथ्यपाणी
औषण ते गुणी
करी काय ?
युगे अठ्ठावीस
उभा विटेवरी
खरा धन्वंतरी
एकमेव.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment