देखे कोंबडीच्या
अंड्याचे टक्कर
क्षणात पसार
पालकूळ.
तशी देवा तुझ्या
कृपेची नजर,
पांगवी विकार
मनातले.
व्याधी - उपाधींचे
गळू दे शेपूट,
करी त्याची तूट
मुळांपून.
पालीच्या जबड्या -
खाली जसा किडा
करी तडफडा
अखेरचा.
तसा क्षणोक्षणी
होतो कासावीस,
काळाचा मी घास
झालो देवा !
No comments:
Post a Comment