पोटच्या पोरीच्या

पोटच्या पोरीच्या
पाळीवर लक्ष
ठेवण्यात दक्ष
मायबाप.

तसे कर माझ्या
शीलाचे जतन,
पतनापासून
वाचविण्या.

पडला मुक्काम 
चोरांच्या गावात
घालुनिया गस्त
राख मला.

माझे काचभांडे
दिले तुझ्या हाती
नको अधोगती
करू त्याची.

No comments:

Post a Comment