वाहन चालक

वाहन चालक
करी तीर्थाटन,
त्यास काय पुण्य
लाभतसे ?

गंगेमध्ये रोज 
ढुंगण जो धुतो,
त्यास काय नेतो
सुखे यम ?

आजवर जे जे 
काशीमध्ये मेले, 
जीव-जंतू गेले
काय स्वर्गी ?

दुखी मन भोगी
नरकयातना
स्वर्ग तो ठेंगणा
आनंदाला.

No comments:

Post a Comment