आई म्हटल्याने

आई म्हटल्याने
होईल का आई ?
सोडील का बाई
सासूपण ?

म्हटले सुनेला
किती लेकबाय
चूल मांडू जाय
वेगळीच.

होईल धर्माचा
कधी दादा-भाऊ ?
खाईल तो खाऊ
चोरूनिया.

मारा किती पेंड
भिंतीला सावत्र
होत नाही मात्र
एकजीव.

No comments:

Post a Comment