तुको बादशहा : श्रीकृष्ण राऊत
नावडे तयात
नावडे तयात
हुडकते दोष,
करूनी सायास
अखंडित.
आवडे तयाचे
करी समर्थन,
असे आहे मन
चालबाज.
लाभ - हानी किती
त्याच्या व्यापारात
बुडे नादारीत
मोजणारा.
होता ओळखीची
त्याची चालरीत
व्हावे मनजित
अनुभवे.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment