तुको बादशहा : श्रीकृष्ण राऊत
नावाचेच काय
नावाचेच काय
नारायण तेल
दूर कै करील
वातरोग?
वाजवी तोंडाला
बडबड्या वात
कंप सर्वांगात
सोबतीला.
हाले डोले मन,
चित्त नाही थीर
आकडते शीर
अभिमाने.
देई देवा मला
आता तुझी वीट
स्वभाव तापट
शेकावया.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment