काळ्या नि पांढर्‍या

काळ्या नि पांढर्‍या
नवविध गोट्या
खेळतात खोट्या
रातदिस.

लाललाल राणी
भंडावते फार
भुषणे कव्हर
मागतसे.

मेहेरबानीचा
नाही संगजिरा
उगी येरझारा
स्ट्राइकरच्या.

कॅरमची गोटी
सिधी पाकिटात
तसा हृदयात
येई देवा.

No comments:

Post a Comment