पुरे झाला तुझा

पुरे झाला तुझा
अरूपाचा जाच
बुबुळाची काच
तडकली.

असो किती थोर
निर्गुणाचा छंद
आसुरी आनंद
वाटे मला.

माणसाच्यावाणी
माणसात राही
नाही तर नाही
धडगत.

No comments:

Post a Comment