तुको बादशहा : श्रीकृष्ण राऊत
किती काळ राहू
किती काळ राहू
भाड्याच्या घरात
उबगले रात -
दिस माझे.
रंगरंगोटीने
वाटते साजरे
परी नाही खरे
समाधान.
परकेपणाची
सारखी टोचणी
करिते चाळणी
जीवाची या.
देई मला जागा
तुझ्या वैकुंठात,
साडे तीन हात
मालकीची.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment