परीट घडीचा

परीट घडीचा
शुभ्र अंगरखा
वर जाता काखा
दावी डाग.

लोभावर  घाला
कितीही पांघर,
उघडा अखेर
पडे तैसा.

लोणच्याच्या नावे
तोंडा सुटे पाणी
लोभियाची वाणी
अती गोड.

भोवती तेजीत
चाले काळा धंदा
वाचवी गोविंदा
तूच आता. 

No comments:

Post a Comment