तुको बादशहा : श्रीकृष्ण राऊत
विठोबाच्या
विठोबाच्या
घरी लग्न
झाले विघ्न
भक्तांसी.
नापिकीचे
सालमान
मानपान
सतरा.
आम्हासाठी
नाही सोपी -
साधी टोपी
विठ्ठला.
साडीसाठी
नको रुसू.
पूस आसू
रुक्माई.
आहेरात
भक्तिभाव
दिला जीव
आंदण.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment