बीज धरे मूळ

बीज धरे मूळ
सांगावे न लागे
येई वर वेगे
भुईतून.

मनातली खुशी
दिसे मुखावर
आंब्याला मोहोर
बोले वारा.

उठे वेदनेने
ज्याच्या पोटी झोंब
त्याच्या ओठी बोंब
आपसूक.

गळोनिया पडे
शेंदराची खोळ
अंगधरी बळ
अंगचेच.

No comments:

Post a Comment