दुकानदाराने

दुकानदाराने 
केले हावभाव
फसवला देव
हातोहात.

नाव गोडेतेल,
खाता तोंड कडू
खोर्‍याने सावडू
जाणे माल.

सातीमधी जाऊ
आता कोण्या तोंडे ?
पाडू काय धोंडे
पायावर ?

घेई आता कोण 
तुझा निका वाण ?
बुडाले दुकान
तुकारामा !


No comments:

Post a Comment