तुझ्या विमानात
नाही काय जागा ?
सांग पांडुरंगा
जिजाईला.
भंडारा डोंगरी
पोचवी शिदोरी
पतीसेवा करी
नित्यनेमे.
रातंदिस घडे
जिला संतसंग
धर्माने अर्धांग
तुकोबाचे.
माऊलीने वंश
वाहिला उदरी
घेतले पदरी
सुखदु:ख.
नाही काय थारा
तिला पायापाशी
एवढी कंजुषी
बरी नाही ?
No comments:
Post a Comment